आश्रम 2 : निष्ठुर आणि क्रूर असणाऱ्या बाबाची काळी बाजू येणार ‘या’ दिवशी समोर; वाचा काय असेल स्पेशल

दिल्ली :

एमएक्स प्लेयर्स या platform वर असलेल्या आश्रम या वेबसिरीजने अनेक चाहत्यांची मने जिंकली. या वेबसिरीजमध्ये काम करणारा मुख्य अभिनेता बॉबी देओलसाठी ही सिरीज प्रचंड लकी ठरली. त्यालाही बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एका झटक्यात प्रचंड यश मिळाले. आता मात्र तुम्हाला निष्ठुर आणि क्रूर असणाऱ्या बाबाची काळी बाजू लवकरच बघता येणार आहे. ११ नोव्हेंबरला आपल्यास भेटीस या सिरीजचा दुसरा भाग येत आहे.

हा भाग चांगला लिहिला गेला आहे, अशी आशा आहे, असे म्हणत आश्रमचा हिरो बॉबी देवलने सांगितले की, मला टीमवर पूर्ण विश्वास आहे कारण आमच्याकडे अभिनेते, तंत्रज्ञांची एक मोठी टीम आहे. दुसर्‍या सत्रात काम चालू आहे. आत्ता, मी फक्त अध्याय 2 डार्क साइडकडे पहात आहे. मी उत्साही आहे आणि मीही पुढचा भाग पाहिलेला नाही. जेव्हा सिरीज रिलीज होईल तेव्हा मीही प्रेक्षकांसमवेत बघेन.

दरम्यान या सिरीजच्या दुसऱ्या भागातील एक छोटा व्हिडीओ बॉबीने आपल्या इन्स्टाग्राम वरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ बघून आपल्याला अंदाज येईल की पुढचा भागही अत्यंत उत्सुकता वाढविणारा आणि मनोरंजन करणारा आहे. तसेच आश्रमच्या मागे असणाऱ्या अनेक अलिखित, अप्रकाशित गोष्टी यानिमित्ताने समोर येणार आहेत.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here