म्हणून जनधन खात्याला आधार करावे लागणार लिंक; मिळेल 2.30 लाखांचा फायदा

मुंबई :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व खातेधारकांचा आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करून घ्यावा लागणार आहे. सीतारमण यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक असला पाहिजे. इतकंच नाही तर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनामध्ये वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा.

असे करा जनधन खातं आधारशी लिंक :-

– तुम्ही बँकेत जाऊन खातं आधारशी लिंक करू शकता.

– यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमची पासबुकचा फोटो घ्यावी लागेल.

– एक फॉर्म सबमिट करावा लागेल.

– तुमचं खातं आधारशी लिंक झालं तर यासंबंधी मोबाइलवर SMS मिळेल.

– जर तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर आणि बँकेत दिलेला मोबाइल नंबर वेगळा असेल तर तुम्हाला मेसेज मिळणार नाही.

जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये ओव्हरड्राफ्टसह रुपे डेबिट कार्डदेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डावर 1 लाख रुपये अपघाती विमा विनामूल्य मिळत आहे. 28.8.2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यावर अपघाती विमा वाढवून आता तो 2 लाख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या कार्डावर 30,000 रुपयांचा मोफत जीवन विमा कव्हरही मिळत आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here