गुंतवणूकदारांनी कमावले 17 लाख कोटी; वाचा कोणत्या शेअर्सने केले मालामाल

मुंबई :

गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून तर आताच्या दिवाळीपर्यंत शेअर बाजारात जोरदार उलाढाल झाली. चढ-उतार दरम्यान सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना सुमारे 10 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबरपासून दिवाळीही शानदार झाली होती आणि जानेवारी 2020 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमांची नोंद केली. पण मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे बाजार अनेक महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रभाव कमी होतानाचे चित्र समोर आले आणि याच पार्श्वभूमीवर बाजारात पुन्हा उसळी आली परिणामी या दिवाळीत पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक नोंदविला गेला.

या कालावधीत मागील 1 वर्षात बऱ्याच शेअर्समुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1264 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबरपासून सेन्सेक्सला आतापर्यंत 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. 27 ऑक्टोबर 2019 रोजी सेन्सेक्स 39250 च्या पातळीवर होता. 10 नोव्हेंबर 2020 रोजी 10 टक्क्यांच्या वाढीसह तो 43,277.65 वर बंद झाला. या काळात बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक सर्वात तेजीत होता.

स्मॉलकॅप निर्देशांक 13310 च्या पातळीवरून 15232 च्या पातळीवर गेला म्हणजेच त्यात 14 टक्क्यांची वाढ झाली. त्याच वेळी, मिडकॅप निर्देशांक 7 टक्क्यांनी वधारला आणि 14441 च्या पातळीवरून 15544 पातळीवर गेला. ब्रॉडर मार्केटबद्दल बोलायचे झाले तर बीएसई 500 मध्ये 8 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. निर्देशांक 15048 वरून 16302 पर्यंत वाढला.

24 मार्च रोजी सेन्सेक्स 25638.9 आणि निफ्टी 7511 च्या खालच्या पातळीवर आला. त्याचबरोबर, जुन्या उच्चांकाच्या 200 दिवसानंतर 9 नोव्हेंबरला सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा विक्रम नोंदविला. 10 नोव्हेंबरला सेन्सेक्सने 43316 आणि निफ्टीच्या 12644 च्या उच्चांकाला स्पर्श केला.

27 ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत चर्चा केल्यास गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 17 लाख कोटींनी वाढ झाली आहे. 27 ऑक्टोबरला बीएसई वर लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 1,49,31,338.13 कोटी रुपये होती. त्याचबरोबर 10 नोव्हेंबरला बीएसई लिस्टेड कंपन्यांची बाजारपेठ 1,66,29,176.75 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचली. म्हणजेच दिवाळीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 17 लाख कोटींची वाढ झाली आहे.

या शेअर्सने केले मालामाल :-

आलोक इंडस्ट्रीज: 1264 टक्के
अडानी ग्रीन: 886 टक्के
डिक्सॉन टेक्नोलॉजी: 264 टक्के
लॉरस लैब: 255 टक्के
अल्काइल एमींस: 224 टक्के
ग्रेनुअल्स इंडिया: 209 टक्के
नवीन फ्लोरीन: 189 टक्के
इंडियामार्ट इंटरमहेश: 184 टक्के
टाटा कम्युनिकेशंस: 184 टक्के
बिरला सॉफ्ट: 180 टक्के

(शेअर्सची वर दिलेली कामगिरी ही मागील 1 वर्षापासूनची आहे)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here