तर अमेझॉनला लागणार वार्षिक टर्नओव्हरच्या 10 टक्के दंड; वाचा, काय आहे प्रकरण

दिल्ली :

आघाडीची ई कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनला उत्सवांच्या सीझनदरम्यान आता मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अमेझॉनवर आपल्या विक्रेत्यांच्या माहितीची गैरउपयोग केला आहे, असा गंभीर आरोप अमेझॉनवर केला आहे. अमेझॉनने आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांच्या माहितीची गैरउपयोग केला त्यामुळे युरोपीय युनियनच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. परिणामी अमेझॉन कंपनीविरोधात युरोपियन युनियनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात अमेझॉन दोषी आढळली तर 1.38 लाख कोटी रुपयांचा दंड अमेझॉनला भरावा लागेल. अमेझॉनवरील या आरोपांची चौकशी सुरु झाली असून कधीही या प्रकरणाचा निकाल समोर येऊ शकतो. या प्रकरणात कंपनी दोषी आढळली तर अमेझॉनला आपल्या वार्षिक टर्नओव्हरच्या 10 टक्के दंड होऊ शकतो. ही रक्कम जवळपास 1.38 लाख कोटी रुपयांपर्यंत असेल.

काय आहे विक्रेत्यांचा आरोप :-

अमेझॉनने स्वतःच्या उत्पादनांची/वस्तूंची विक्री अधिक व्हावी म्हणून आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इतर विक्रेत्यांच्या माहितीचा दुरुपयोग केला. त्यांनी आपल्या नफ्यासाठी वस्तूंची विक्री वाढावी म्हणून इतर विक्रेत्यांच्या माहिती गैरवापर केला.

काय आहे युनियनचा नियम :-

नियमांनुसार ई कॉमर्स प्लेटफॉर्म थर्ड पार्टी सेलर्सच्या व्यवहारांची माहिती आपल्या फायद्यासाठी वापरु शकत नाही. अस करणं बेकायदेशीर आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here