दिवाळीमध्ये सतावतेय पैशांची कमी; ‘या’ कार्डवर मिळेल 1 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडीट

मुंबई :

कोरोनामुळे अनेक लोक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना खर्च करण्यासाठी अनेकांना पैशांची चिंता सतावते आहे. आता टेंशन घेण्याची गरज नाही कारण आता भारतीय डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विक यांनी कार्ड कंपनी अमेरिकन एक्सप्रेससह एकत्रितपणे आपले पहिले ‘मोबिक्विक ब्लू अमेरिकन एक्सप्रेस कार्ड’ सादर केले आहे. या कार्डचे क्रेडिट लिमिट 1 लाख रुपयांपर्यंत ठेवले गेलेले आहे. 

हे ब्लू कार्ड मोबिक्विक पूर्णपणे फायनान्स टेक कंपनी बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अमेरिकन एक्सप्रेसच्या सामरिक गुंतवणूकीचे अ‍ॅमेक्स वेंचर्स यांनी मोबिक्विकमध्ये गुंतवणूक केलेली आहे, अशी माहिती मोबिक्विकच्या सह-संस्थापक आणि सीओओ उपासना टाकू यांनी दिली.

आमचे प्रयत्न सतत नाविन्यपूर्ण भागीदारी बनवणे आहेत. आमच्या विद्यमान ग्राहकांना सर्वात आकर्षक प्रोडक्‍ट्स आणि सर्व्हिसेस उपलब्‍ध करून द्यायचे आहेत, अशी माहिती अमेरिकन एक्सप्रेसचे उपाध्यक्ष तसेच भारत आणि दक्षिण आशियासाठी ग्लोबल नेटवर्क सर्व्हिसेसच्या प्रमुख दिव्या जैन यांनी सांगितली.

अशा पद्धतीने मिळवा क्रेडीट :-

  • – मोबिक्विक अ‍ॅप डाऊनलोड करा. जुने ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये असलेले अ‍ॅप अपडेट करा.
  • – अ‍ॅपमध्ये लॉगिन किंवा साइन अप करा. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अ‍ॅपवर रजिस्‍टर करावा लागेल.
  • – रजिस्‍टर्ड क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो टाकताच, आपण अ‍ॅपवर रजिस्‍टर व्हाल.
  • – अमेरिकन एक्सप्रेसचा लोगो मुख्य स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात दिसेल. या लोगोवर क्लिक करा.
  • – आपण अमेरिकन एक्सप्रेस लोगो वर क्लिक करताच आपले व्हर्च्युअल प्रीपेड कार्ड अ‍ॅक्टिवेट होईल.
  • – हे कार्ड यूजर्सना 10 हजार रुपयांच्या खरेदीवर 1 टक्के सुपर कॅश आणि दिवाळी खरेदीवर 20 टक्के बचत देण्यात येत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here