चहामध्ये साखरेऐवजी वापरा मध; ‘असे’ होतील आरोग्यदायी फायदे

चहा आणि भारतीय माणूस हे एक न तुटणारे समीकरण आहे. म्हणून तर सध्या भारतात सगळ्यात जास्त दुकाने असतील तर ती चहाची आहेत. महाराष्ट्रात तर दर फुटाला नवीन चहाचे दुकान आढळून येते विशेष म्हणजे ही दुकाने चालतात. चहा हे हळूहळू शरीरात भिनणारे विष आहे, हे माहिती असूनही लोक चहा पितात. मात्र चहाचे तोटे आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. चहा शरीरासाठी प्रचंड हानिकारक आहे. आज आम्ही आपल्याला चहामध्ये साखरेऐवजी मध वापरल्यास काय फायदे होऊ शकतात, याविषयी सांगणार आहोत. केवळ चहातूनच नाही तर तुम्ही मध रोज एक चमचा कच्चा खाल्ला तरीही त्याचा तुमच्या शरीराला फायदा मिळू शकतो.

हे आहेत आरोग्यदायी फायदे :-

  • पचनतंत्रासाठीही मध हा साखरेपेक्षा सरस ठरतो.
  • रक्ताच्या पातळीचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी अधिक फायदेशीर
  • मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, विटामिन सी, मिनरल्स, अमिनो अॅसिड्स आणि काही एन्जाईम्सदेखील असतात.
  • मधामध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल घटकांमुळे किटाणूंना मारण्यासाठी याचा जास्त उपयोग करून घेता येतो.
  • प्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत मिळते.
  • सर्दी – खोकला यासाठी औषध म्हणून मधाचा चहा पिऊ शकता.
  • साखरेमुळे होणाऱ्या सर्व तोट्यापासून मुक्तता मिळते. (जसे की मधुमेह)
  • पचनक्रिया सुधारण्यासाठीही मध फायदेशीर आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here