आयपीएलची किंग मुंबईच! पटकावले विजेतेपद

दुबई :

पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच किंग असल्याचे टीमने सिद्ध केले आहे. जबरदस्त अशी खेळी करत मुंबईने सगळ दुसऱ्यांदा आणि आजवर पाचव्यांदा आयपीएलची फायनल जिंकली आहे. रोहित शर्माच्या मुंबईने पुन्हा एकदा आपणच आयपीएलचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. दिल्ली विरुद्धच्या फायनलमध्ये मुंबईचा दणदणीत विजय झाला आहे. या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

मुंबईचे आयपीएल स्पर्धेचं पाचवं जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सने याधी 2013, 2015, 2017, 2019 अशा चारवेळा जेतेपदांवर नाव कोरलं आहे. गतविजेत्या मुंबईने दिल्लीला 156 रन्समध्ये रोखलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्माने ट्वेन्टी-20प्रकारात कशी बॅटिंग करावी याचा वस्तुपाठ सादर करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मुंबई इंडियन्सला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 56 धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

याव्यतिरिक्त डी काॅकने 20(12), सूर्यकुमारने 19(20), कायरन पोलार्डने 9(4) तर हार्दिक पांड्य़ाने 3(5) धावा केल्या. क्रुणाल पांडया 1 धावेवर नाबाद राहिला. दिल्लीचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडाने अंतिम सामन्यात निराशा केली. त्याच्याकडून अपेक्षा असताना त्याने 3 षटकात 32 धावा देत 1 गडी बाद केला. एनरिक नाॅर्टजेने 2.4 षटकात 25 धावा देत 2 तर मार्कस स्टोईनिसने 2 षटकात 23 धावा देत 1 गडी बाद केला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here