बाबो… जिंकले म्हणून ‘त्या’ ११९ उमेदवारांचे आधी केले अभिनंदन; नंतर सांगितले तुमचा झाला पराभव; वाचा, बिहार इलेक्शनचा सर्वात मोठ्ठा घोळ

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हाती आलेल्या माहितीनुसार एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली होती. आता मात्र संपूर्ण चित्र पलटले असून भाजपप्रणीत एनडीएची विजयी वाटचालीच्या दिशेनं आगेकूच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अद्यापही मतमोजणी सुरु असून ५० लाखांची मोजणी अजून बाकी असल्याचे कळत आहे. अशातच निकालांमध्ये घोळ घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे.

राजदनं ट्वीट करत म्हटले आहे की, जवळपास १० जागांवर नितीश प्रशासन मतमोजणीस उशीर करत आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री निवासस्थानात बसून नितीश कुमार आणि सुशील मोदी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून सर्व डीए आणि आरओंना फोन करत आहेत. अटीतटीच्या लढतीत आमच्या बाजूनं निकाल द्या, यासाठी त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे.

राजदनं ११९ विजयी उमेदवारांची यादीच ट्विट केली आहे. राजदने ट्वीट करत म्हटलं आहे की,  ‘ही महागठबंधनच्या ११९ विजयी उमेदवारांची यादी आहे. रिटर्निंग ऑफिसरनं या उमेदवारांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. मात्र आता ऑफिसर त्यांना प्रमाणपत्र देत नाहीत. तुम्ही पराभूत झाला आहात, असं सांगितलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही यांची नावं विजयी म्हणून दाखवली जात आहेत.

‘नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत १०५-११० जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही,’ असंही राजदनं ट्विट करत म्हटलं आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here