गाढ झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ पदार्थांचे सेवन; मिळेल गाढ झोपेचे सुख

झोप ही मानवाची सर्वात मोठी गरज आहे. विशेष म्हणजे जे सुख झोपेत आहे ते इतर कशातच नाही, असेही बडे बडे तत्वज्ञानी मंडळी सांगून गेले आहेत. कॉलेजवयीन मुलांपासून तर कॉमन मॅन आणि रिटायर्ड झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेक लोक मनसोक्त, गाढ झोप घेत/भेटत/येत नाही. …साला झोप नाही झाली राव, झोपच येत नाही भो…असे अनेक वाक्य आपण नेहमीच विविध लोकांच्या तोंडून ऐकत असतो. साधारणतः झोपण्यापूर्वी काहीही न खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र आज आम्ही आपल्याला झोपण्यापुर्वी कोणते पदार्थ खावेत, याचा सल्ला देणार आहोत.

– केळीत असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे ट्रिप्टोफेनची निर्मित होण्यास मदत होते, यामुळे चांगली झोपदेखील येते.

– एक ग्लास गरम दूध पिल्याने मेंदू शांत होतो. परिणामी झोप चांगली येते.

– मधाचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. म्हणून गाठ झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी मधाचं सेवन करावं.

– गाढ झोपेत एखाद्या कारणामुळे अडथळा येत असेल तर झोपण्यापूर्वी बदाम खा. यामुळे लवकर झोप येण्यास मदत मिळते.

– रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी दलिया अवश्य खावा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here