बिहार विधानसभा निवडणूक: राजदने मोदींवर केला ‘तो’ गंभीर आरोप; वाचा काय आहे प्रकरण

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हाती आलेल्या माहितीनुसार एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली होती. आता मात्र संपूर्ण चित्र पलटले असून भाजपप्रणीत एनडीएची विजयी वाटचालीच्या दिशेनं आगेकूच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अद्यापही मतमोजणी सुरु असून ५० लाखांची मोजणी अजून बाकी असल्याचे कळत आहे. अशातच निकालांमध्ये घोळ घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे.

राजदनं ट्वीट करत म्हटले आहे की, जवळपास १० जागांवर नितीश प्रशासन मतमोजणीस उशीर करत आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री निवासस्थानात बसून नितीश कुमार आणि सुशील मोदी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून सर्व डीए आणि आरओंना फोन करत आहेत. अटीतटीच्या लढतीत आमच्या बाजूनं निकाल द्या, यासाठी त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप राजदकडून करण्यात आला आहे. महागठबंधनमधील सर्व पक्षांनी याबद्दलची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here