म्हणून रिपब्लिक टीव्हीच्या डिस्ट्रीब्यूशन प्रमुखालाही झाली अटक; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक न्यूज चॅनलचे डिस्ट्रीब्यूशन हेड आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सहाय्यक उपाध्यक्ष घनश्याम सिंह यांना अटक केली असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी घनश्याम सिंह यांना मंगळवारी सकाळी त्यांच्या ठाण्यातील घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

पैसे देऊन टीआरपी वाढवल्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सिंह यांना ताब्यात घेतलं आहे. याआधी मुंबई क्राइम ब्रांचने कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. मुंबई क्राइम ब्रांचने उघड केलेल्या या कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

काय आहे TRP घोटाळा प्रकरण :-

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी हे घोटाळे प्रकरण बाहेर काढले होते. रिपब्लिक न्यूजसोबत फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांनाही पोलिसांनी अटक केली होती. TRP घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी हंसा रिसर्चच्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर हा कथित धोटाळा उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here