रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन; नक्कीच जाणवेल फरक

बदलती जीवनशैली, बैठे काम करण्याची पद्धत, पौष्टिक नसणारा आहार, आणि व्यायामाचा अभाव यामुळे सध्या तरुणाई विविध आजारांनी ग्रासलेली आहे. लठ्ठपणा तर भारतीय तरूण सर्वात पुढे आहेत. बहुतांश तरुणांना मधुमेह आणि रक्तदाबाचा अगदी कमी वयात त्रास आहे. परिणामी अनेक व्यक्तींना हृदयरोगाचाही त्रास होतो. सध्या मार्केटमध्ये रक्तदाबावर अनेक औषधे/गोळ्या आहेत. मात्र सतत गोळ्या खाण्याचेही अनेक तोटे आहेत. औषधाच्या मार्‍यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. मग ही औषध कमी करायची असतील तर त्यासोबत आहारात काही पदार्थांचा समावेश करणं तसेच आहाराचं पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. आहारामध्ये बदल केल्यास तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता.

या गोष्टींचे करा सेवन :-

  1. हिरव्या पालेभाज्या शरीरातील अतिरिक्त सोडिअमपासून आपल्याला मुक्तता मिळवून देण्याचं काम करतात. म्हणून आहारात पालक, कोबी, कारले अशा हिरव्या पालेभाज्याचे सेवन करावे.
  2. ओट्स शरीरासाठी अतिशय पोषक असतात. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक तर फॅट्स कमी प्रमाणात असतात. म्हणून ही पोषकतत्त्वे ब्लड प्रेशरचा त्रास कमी करण्यासाठी लाभदायक आहेत. म्हणून सकळी ओट्स खाल्ले तर फायदेशीर ठरतील.
  3. दिवसभरात तीन कीवी खाल्ल्यास हाय ब्‍लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास तुम्हाला चांगली मदत मिळेल.
  4. सकाळच्या सुमारास पाण्यासोबत कच्चं लसूण खावे कारण लसूणच्या सेवनामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
  5. दह्याच्या सेवनामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here