असे बनवा ‘खवा नारळ बर्फी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बहुतांशवेळा आपण स्वीट होममधील पदार्थ घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो परंतु थोडे माप इकडे तिकडे झाले की पदार्थची चव बदलते. आणि पदार्थ फसतो. विविध प्रकारच्या बर्फी बनवताना आपल्याकडून हे नकळत घडते. म्हणूनच आज आम्ही आपल्या घरच्या घरी टेस्टी ‘खवा नारळ बर्फी’ कशी बनवायची याविषयी सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. १ नारळ
  2. २०० ग्रॅम खवा
  3. ५०० ग्रॅम रवा
  4. २५० ग्रॅम तुप
  5. ५०० ग्रॅम साखर
  6. २ टीस्पून वेलची पावडर
  7. २ टीस्पून काजू पिस्ते

हे साहित्य घेतलं असेल वाट कसली बघताय लागा की बनवायला…

  1. प्रथम खवा भाजून घ्या. तूप टाकून रवा भाजून घ्याव. खोबर खवून घ्या.
  2. नंतर भाजलेला रवा व खोबर परत एकदा परतून घ्यावं. दुसऱ्या पातेल्यात साखरेचं पाणी घालून पाक करावा. त्या पाकात खवा, रवा, खोबर सर्व टाकावं. थोडी वेलची पावडर टाकावी. सर्व एकत्र करून घ्यावे.
  3. ते थोडे आळून आल्यावर परातीला तूप लावून त्यात ओता. नंतर त्याच्या चौकोनी आकाराच्या वडया पाडा. आता बर्फी तयार झाल्यावर त्याला काजू, पिस्ते लावून सजवा…

संपादन : संचिता कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here