असे बनवा जपानी खाद्य संस्कृतीचे ‘तेरियाकी चिकन’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजही आम्ही वाचकांच्या मागणीनुसार आज आम्ही एक आंतरराष्ट्रीय पदार्थ आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत. ही रेसिपी बेसिकली जपानमधील आहे. जपानची ओळख आपल्याला २ गोष्टींमुळे आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक जापनिज नागरिकांच्या अंगात भिनलेली कायझन प्रवृत्ती (सातत्याने प्रगतीचा ध्यास) आणि दुसरे म्हणजे इतर देशांशी असलेले त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध.

जपानच्या खानपान संस्कृतीत ‘तेरियाकी चिकन’ हा पदार्थ प्रचंड प्रसिद्ध आहे. तुम्हीही नक्कीच ट्राय करा.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. ५०० ग्रॅम चिकन विंग्स
 2. 2 टेबल स्पून सफेद तीळ
 3. 1/2 टेबल स्पून काळीमिरी पावडर (ऐच्छिक)
 4. 4 टेबल स्पून तेल

चिकन मॅरिनेशन साहित्य :-

 • 2 टेबल स्पून व्हिनेगर
 • 1 टेबल लसूण पेस्ट
 • 1/2 टेबल स्पून काळीमिरी पावडर

तेरियाकी सॉस बनवण्याचे साहित्य :-

 • 2 टेबल स्पून सोया सॉस
 • 2 टेबल स्पून साखर
 • 1 टेबल स्पून पाणी
 • 2 टेबल स्पून राईस ब्रान वाईन (ऐच्छिक)

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. इथे रेडीमेड तेरियाकी सॉस मिळाला तर तोही वापरु शकता. प्रथम चिकन विंग्स स्वच्छ धुवून त्याला व्हिनेगर, लसूण पेस्ट व काळीमिरी पावडर लावून १०-१२ मिनीटे मॅरिनेट करावे.
 2. चिकन विंग्स मॅरिनेट होईपर्यंत, दुसरीकडे एका भांड्यात सोया सॉस, साखर व पाणी एकत्र करुन तेरियाकी सॉस बनवून घ्यावा.
 3. आता पॅनमधे तेल गरम करुन त्यात मॅरिनेट केलेले चिकन विंग्स दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करावे.
 4. फ्राय झालेल्या चिकन विंग्स मधे आता तेरियाकी सॉस घालून चांगले, ग्रेव्हीला ग्लेज येईपर्यंत शिजवावे. नंतर त्यात काळीमिरी पावडर आणि सफेद तीळ घालून ४-५ मिनीटे शिजवावे.
 5. तेरियाकी चिकन डिश खाण्यासाठी तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here