सीसीआय प्रकरणी ‘गुगलपे’च्या चौकशीचे आदेश; ‘या’ ५ कंपन्यांनाही बसणार झटका

मुंबई :

भारतातील आघाडीचे पेमेंट अॅप ‘गुगलपे’च्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. सीसीआय प्रकरणी ‘गुगलपे’ या मोठ्या अॅपला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात ‘गुगलपे’सोबत ईतरही पाच कंपन्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणात महासंचालक (डीजी) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून ‘गुगलपे’सोबत अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याही कंपन्यांची चौकशी होणार आहे.  

‘गूगल’पे चं वर्तन अयोग्य असून तो बाजारात कंपनी इतर अॅप्समध्ये भेदभाव करते. यामुळे ऑनलाईन पेयमेंटच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपला बाजार जागा मिळत नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. ‘कंपनीने कायद्याच्या कलमांचे व विविध तरतुदींचं पालन केले नाही. नियमांचे देखील उल्लंघन केले आहे’, असे सीसीआयने दिलेल्या 39 पानांच्या आदेशात म्हटलेले आहे.

‘गूगल’पेच्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here