म्हणून तज्ञ देत आहेत आयटीसी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला; वाचा काय आहे कारण

मुंबई :

अ‍ॅन्टिक ब्रोकिंग, आयआयएफएल सिक्युरिटीज, इलारा कॅपिटल, जेफरीज, कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीज आणि सीएलएसए या आघाडीच्या दिग्गज बोकरेज कंपन्यांनी आयटीसी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज कंपन्या एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज आयटीसीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देतात. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली असा त्यांचा विश्वास आहे.

मंगळवारी आयटीसीच्या शेअर्सची किंमत 0.61 टक्क्यांनी वाढून 173.85 रुपये झाली. दुसर्‍या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 19.65 टक्क्यांनी घसरून 3,232.40 कोटी रुपये झाला. मात्र, एफएमसीजी व्यवसायाचा महसूल गेल्या वर्षीच्या 8,615.14 कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून 8916.25 कोटी झाला आहे.

सीएलएसए या ब्रोकरेज कंपनीला 3 ते 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. सीएलएसएने दिलेल्या माहितीनुसार ‘एफएमसीजीने आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली. त्याला शेप रिकवरी असे म्हटले जाऊ शकते. चांगली मागणी, चांगले मार्जिन आणि लोअर कॅपेक्स बघता एफएमसीजीच्या नफ्यात वाढ झाली आहे’.

कंपनीच्या शेअर्सचा डिविडेंड यील्ड सुमारे 5 टक्के आहे. जे अत्यंत महत्वाचे आणि आकर्षक आहे. जेफरीज याबड्या ब्रोज्क्रेज कंपनीने 265 रुपयांची किंमत देऊन हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here