बिहार विधानसभा निवडणुक: शिवसेना उमेदवारांची ‘अशी’ आहे अवस्था

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील माहिती हाती आली आहे. त्याप्रमाणे आता एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. मात्र आता शिवसेनेला मोठा फटका बसला असल्याचे दिसत आहे.  

महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवणारा पक्ष बिहार निवडणुकीत मोठी कसरत करताना दिसत आहे. शिवसेनेची एकाही जागेवर अद्याप आघाडी सुद्धा उघडली नाही. त्यामुळे सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचे चिन्ह दिसत आहे.  

मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संपादन : स्वप्नील पवार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here