बिहार विधानसभा निवडणूक : भाजपा नेत्याचं मोठं विधान; नितीश कुमारांचं मुख्यमंत्रीपदाला सुरुंग?

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील माहिती हाती आली आहे. त्याप्रमाणे आता एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे.

असे असले तरी निकालाचा कल भाजपा आणि जेडीयू आघाडीला बिहारमध्ये बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र या आघाडीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने जेडीयूही चिंतेत आहे. बिहारमध्ये भाजपाला ७० हून जास्त जागा मिळतील असं निकालांच्या कलमध्ये दिसत आहे. 

अशातच भाजप नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केल्याने नितीश कुमारांचं मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. 

या विधानावरून स्पष्ट संकेत मिळत आहे की भाजपा आणि जेडीयू आघाडी असली तरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपचा असू शकतो. गेल्या १५ वर्षापासून नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत आहेत, त्यामुळे सरकारविरोधी फटका जेडीयूला बसला असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. मात्र निवडणुकीच्या निकालामुळे मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडे राहणार का? सध्या या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here