अबबब… वॉरेन बफेंच्या ‘या’ कंपनीलाही बसला कोरोनाचा झटका; झाले ‘एवढे’ आर्थिक नुकसान

दिल्ली :

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अनेक बड्या बड्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवरही परिणाम झाला आहे. जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना कोरोनाने झटका दाखवत आर्थिक संकटात आणून सोडले आहे.

बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीने शनिवारी सप्टेंबर तिमाहीचा निकाल सादर केला. या निकालात दिलेल्या माहितीप्रमाणे कंपनीला कामकाज पातळीवर मोठे नुकसान झाले आहे. एपलसारख्या स्टॉकमधील जोरदार तेजी देखील बफेंच्या कंपनीला तोट्यापासून वाचवू शकली नाही. बर्कशायरमधील बर्‍याच व्यवसायांनी खालच्या पातळीवरुन चांगली कमाई केली आहे, मात्र तरीही कंपनीच्या महसुलात 3 टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती ईकॉनॉमीक टाईम्सने दिली आहे.

कोविड-19 मुळे विमा व्यवसायाच्या नफ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. जीको (वाहन विमा कंपनी) आणि प्रेसिजन कार्टस्पार्ट (एअरलाइन्स पार्ट कंपनी) यांचा व्यवसाय कोलमडला. तसेच कोट्यवधी लोकांचे रोजगारही गमावले.

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत बायबॅकला 16 अब्ज डॉलर्स मिळाले. जे ऑक्टोबरमध्ये 2.3 अब्ज झाले. बर्कशायर शेअर्सची संख्या घटली. बर्‍याच विश्लेषकांचा असा अंदाज आहे की बायबॅकमुळे बाजार तेजीत आहे, परंतु बर्कशायरने जाणीवपूर्वक कठीण काळात पैसे आपल्याजवळ बाळगले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here