बिहार विधानसभा निवडणूक अपडेट : महाआघाडीला १०० जागांवर आघाडी, एनडीए आहे ‘इतक्या’ जागांवर पुढे

पटना :

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून आज 38 जिल्ह्यासाठी मतमोजणी ही 55 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. देशाचे विशेषत: बिहारच्या 3 कोटींहून अधिक मतदारांसह 3734 उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार महाआघाडीला 100 जागांवर आघाडी असून एनडीए 59 जागांवर पुढे आहे.

निवडणूक जवळ आल्यानंतर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली अगदी जागावाटपासून ते पुढील सर्व गोष्टी नियोजनबद्ध रितीने पार पडल्या. अर्थात यासाठी तेजस्वी यादव यांनी अथक मेहनत घेतली. निवडणुकीच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सर्वाधिक 251 सभा घेतल्या. ही आकडेवारी बरेच काही सांगून जाणारी आहे.

 मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here