‘त्या’ बातमीमुळे सोन्या-चांदीत मोठी घसरण; कच्च्या तेलाच्या दरात वाढ

दिल्ली :

औषधउत्पादक कंपनी फायझरने दावा केला आहे की त्यांची कोरोना लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात गेली आहे. याचा थेट आणि स्पष्ट परिणाम कमोडिटी मार्केटवर दिसून आला. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली तर कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झालेली दिसली.

कोरोना लस लवकर आल्याच्या या एका बातमीचा इंधन, शेअरमार्केट आणि धातूंच्या किमतीवर झालेला परिणाम समोर आला आहे. लसविषयी चांगली बातमी आल्यावर गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. सुरक्षित गुंतवणूकीकडे लोकांचा कल कमी होणार आहे.

परदेशी बाजारात अमेरिकन गोल्ड फ्यूचर 4.9 टक्क्यांनी घसरले आणि प्रति औंस 1855.30 डॉलरवर घसरले, तर गोल्ड स्पॉट 4.9 टक्क्यांनी घसरून1854.44 डॉलर प्रति बॅरल झाले. सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती जोरदार वाढल्या आणि आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 8 टक्क्यांनी वाढून 42.61 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here