बिहार विधानसभा निवडणूक अपडेट : थेट ३७ जागांनी ‘हा’ पक्ष आघाडीवर

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील माहिती हाती आली असून आता एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. तेजस्वी यादव यांचा राजद पक्षाने आघाडी घेतली असून पक्ष 37 जागांनी आघाडीवर आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. आज हे निश्चित होणार आहे की नितीशकुमार यांना सलग चौथ्यांदा राज्यसत्ता मिळणार आहे की सत्ता परिवर्तन होईल. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून आज 38 जिल्ह्यासाठी मतमोजणी ही 55 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे.

 मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here