‘त्यांना’ जगणे कठीण झालेच, पण चहा उत्पादकही मेले; शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

मुंबई :

नोटबंदीसारखा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. त्याला ४ वर्ष झाली. याच पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलेले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

कश्मीर खोऱयात घुसखोरी व चकमकी वाढल्या आहेत. जवानांच्या बलिदानाचा आकडा वाढतो आहे. म्हणजे ‘काळा पैसा’, बनावट ‘नोटां’चा सुळसुळाट कायम असून नोटबंदीचा परिणाम दहशतवाद्यांवर झालेला नाही. उलट नोटबंदीने अर्थव्यवस्था झोपली ती पुन्हा उठलेली नाही. लाखो लोकांनी नोकऱया गमावल्या. देशाच्या आर्थिक विकासाची गती मंदावली, पण पंतप्रधान सांगतात, नोटबंदी निर्णयामुळे पारदर्शकतेला बळ मिळाले. आर्थिक व्यवहाराला सुसूत्रता आली. हे सर्व सरकारी ‘वक्तव्य’ आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. नोटबंदीने अर्थव्यवस्थेचा कणा मोडलाच होता. त्यात कोरोना, लॉकडाऊनमुळे कंबरडेही मोडून पडले. देशातील चहा टपरीवाल्यांना तर जगणे कठीण झालेच, पण चहा उत्पादकही मेले.

चहाचा खास उल्लेख यासाठी की, एक चहा विकणारा नेता देशाचा पंतप्रधान झाला. त्यामुळे गोरगरीब जनतेने अपेक्षा बाळगल्या. पण या अपेक्षा पूर्ण झाल्या काय? देशाची अर्थव्यवस्था सध्या ज्या गतीने घसरत आहे, ही घसरण अशीच राहिली तर जनता रस्त्यावर उतरेल व देशात अराजकाचा वणवा भडकेल, असा इशारा रघुराम राजनसारखे जानेमाने अर्थतज्ञ देत आहेत. मुळात वायदा परदेशातील काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात आणण्याचा होता व या काळय़ा पैशांतून जनतेच्या बँक खात्यांत प्रत्येकी पंधरा लाख टाकू, असा श्री. मोदी यांचा शब्द होता. त्याचे काय झाले?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here