‘त्यामुळे’ अर्थव्यवस्था झोपली ती पुन्हा उठलेली नाही; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई :

नोटबंदीसारखा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. त्याला ४ वर्ष झाली. याच पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलेले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

‘नोटबंदी’ हा आपल्या देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय होता. नोटबंदी निर्णयास चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निर्णयामुळे देशाचे, जनतेचे कसे कल्याण झाले त्यासाठी वारेमाप प्रसिद्धी करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी दावा केला आहे की, नोटबंदीमुळे काळा पैसा कमी होण्यास मदत झाली. पंतप्रधानांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. मुळात वायदा परदेशातील काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात आणण्याचा होता व या काळय़ा पैशांतून जनतेच्या बँक खात्यांत प्रत्येकी पंधरा लाख टाकू, असा श्री. मोदी यांचा शब्द होता. त्याचे काय झाले? नोटबंदीमुळे कश्मीर खोऱयातील दहशतवाद संपून जाईल, असाही दावा होता. दहशतवादास जो अर्थपुरवठा केला जातो तो काळा पैसा असतो. त्यात बनावट नोटांचे प्रमाण जास्त असते. तेच आता बंद होईल, त्यामुळे कश्मीर खोऱयातील रक्तपातास लगाम लागेल, पण प्रत्यक्षात तसे काही झाले आहे काय? पंतप्रधान व त्यांचे सहकारी नोटबंदीचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करीत होते. त्यावेळी जम्मू-कश्मीरच्या माछिल क्षेत्रात अतिरेकी घुसले. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत चार लष्करी

जवानांना वीरमरण

पत्करावे लागले. कश्मीर खोऱयात घुसखोरी व चकमकी वाढल्या आहेत. जवानांच्या बलिदानाचा आकडा वाढतो आहे. म्हणजे ‘काळा पैसा’, बनावट ‘नोटां’चा सुळसुळाट कायम असून नोटबंदीचा परिणाम दहशतवाद्यांवर झालेला नाही. उलट नोटबंदीने अर्थव्यवस्था झोपली ती पुन्हा उठलेली नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here