कार्यक्रम होणार : बिहारमध्ये 45 जागांवर 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर, वाचा कोण आहे पुढे

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील माहिती हाती आली असून आता एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे.

243 जागांपैकी 7 जागांवर भाजपा, राजद 61, जेडीयू 52, काँग्रेस 22 आणि भाकपा-माले 13, व्हीआयपी सहा, एलजेपी 4 जागांवर आणि माकपा तीन जागांवर पुढे आहेत. अन्य पक्ष, अपक्षांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे जवळपास 47 जागांवर दोन उमेदवारांमध्ये 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. आज हे निश्चित होणार आहे की नितीशकुमार यांना सलग चौथ्यांदा राज्यसत्ता मिळणार आहे की सत्ता परिवर्तन होईल. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here