बिहार विधानसभा निवडणूक: 1 कोटी मतमोजणी पूर्ण; वाचा, काय आहेत अंदाज

मुंबई :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील माहिती हाती आली आहे. त्याप्रमाणे आता एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. 4 कोटी पैकी फक्त 1 कोटी मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दुपारी 2 वाजेपर्यंत एनडीए 130 तर महाआघाडी 102 जागांवर आघाडीवर आहे. महत्त्वाचं म्हणजे अशा अनेक जागा आहेत जेथे खूप कमी अंतराचा फरक आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बिहारमध्ये ‘टुडेज चाणक्य’नं तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्व महागठबंधनला 180 जागा मिळतील असं भाकित वर्तवलं होतं. मात्र, बिहारमध्ये परिस्थिती या उलट दिसत आहे. नीतीश कुमार यांच्या नेतृत्त्वातील एनडीए 130 जागांवर आघाडीवर आहे. एक्झिट पोलचे अंदाज या आधीही अनेकदा चुकीचे ठरले आहेत. आता बिहार निवडणुकीबाबतही तेच झालं आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वनीयता आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here