म्हणून सलग चौथ्या दिवशीही झाली सोने दरात वाढ; वाचा, आजचे दर

दिल्ली :

अमेरिकन निवडणूक आणि सणावारांचा चालू झालेला सिझन याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर जाणवू लागला आहे. सणासुदीच्या काळात दरात वाढ होणे, हे मार्केटचे मूळ लक्षण आहे. आणि आता सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सोन्याच्या दरात 277 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. चांदीचे दरही 650 रुपये प्रति किलोग्रॅमने वधारले आहेत. 

सध्या अमेरिकेची निवडणूक जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरणार आहे. जगभरातील राजकीय वर्तुळासह आर्थिक जगताचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे. अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या निवडीने आणि प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेमुळे, दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घडामोडी जसे की इंधन, शेअर मार्केट, सोने-चांदीचे दर यात मोठ चढउतार जाणवत आहे. 

सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 277 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्यामुळे, सोन्याचा दर 52,183 रुपयांवर पोहचला आहे. याआधी शुक्रवारी, सोन्याचा दर 51 हजारांच्या घरात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1960 रुपये प्रति औंस होता.

अमेरिकेत सत्ता परिवर्तन होण्याबरोबरच जास्त आर्थिक प्रोत्साहन पॅकेज मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होते आहे, असा अंदाज सांगितला जात आहे.

दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 650 रुपये प्रति किलोने वाढून 65,699 रुपये इतका झाला आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 65,005 रुपये इतका होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 25.75 डॉलर प्रति औंस होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here