‘त्या’ मुद्द्यावरून आक्रमक होत भाजपचा सवाल; मुख्यमंत्री आता स्वतःला अटक करून घेणार का ?

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्नब गोस्वामी यांना अटक झाली. यानंतर भाजपने प्रचंड आक्रमक भूमिका घेतली होती. आता एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. एका आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याने ठाकरे सरकारचा उल्लेख आपल्या सुसाईड नोटमध्ये करून तेच आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर ;गेल्या कित्येक महिन्यांपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असलेल्या कर्तव्यनिष्ठ एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन या राज्य सरकारने अजूनही थकवून ठेवले आहे. आधीच आर्थिक परिस्थिती ढासळली असताना वेळेवर वेतन नाही, तर कुटुंबाला पोसायचं कसं? या चिंतेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे पाटील यांनी म्हटले आहे की, आता जुन्या गोष्टी उकरून काढून पत्रकार अर्णब गोस्वामी तुरुंगात डांबणारे मुख्यमंत्री स्वतःचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आल्यानंतर स्वतःला अटक करवून घेणार आहेत का? याच उत्तर त्यांनीच द्यावं.

पले परिवहन मंत्री अनिल परब जे या गोष्टींवर कधीही काही बोलत नाहीत, मात्र इतर विषयांवर माथेफोडी करण्यासाठी त्यांना वेळ असतो. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मात्र आता मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही?, असाही सवाल पुढे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here