हे अस्सल पुणेरी विनोद वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

1) पितृपक्ष स्पेशल..

एक छोटीशी मुलगी आजीला विचारते:
“आजी, रोज आपल्या घरी एक बाई आणि माणूस रात्री एकत्र येतात आणि सकाळी गायब होतात…
ते कोण आहेत??

आजी- “हे ईश्वरा, तू त्यांना बघितलंस वाटतं…
ते दोघं तुझे आई बाबा आहेत….
जे खूप वर्षांपासून हिंजवडीत जॉब करतात

२)

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.

मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो ………….
.
.
.
.
मुख्य प्रवेशद्वार.

३) एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.

वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,
पण काहीच उपयोग झाला नाही.

शेवटी तो बॉसला म्हणाला,
“हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत
तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून.

४) मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत
पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात.

‘उभं रहा आणि जरा बोलायला शिक’

आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात,

‘खाली बस आणि जरा ऐकायला शिक’ 

५) काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात…
(पेट्रोल – ८८ रु बघतात)

पम्पवाला: कितीच टाकू?

काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो..

६) जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?

घड्याळ दुरुस्त करण्याची …

७) एअरटेल 4G वाली मुलगी गेली पुण्यात जोशी काकूंच्या घरी….

आणि म्हणाली ” माझ्या आधी डाऊनलोड करुन दाखवा आणि,
मोबाईल बील फ्री फाँर लाईफटाईम”

काकू म्हणाल्या,
तु माझ्या आधी वरण भाताचा कुकर लावुन दाखव,
तुझं बील मी भरते फाँर लाफफटाईम..

कसल्या डाऊनलोडच्या स्पर्धा लावताय,
साधा स्वयंपाक येत नाही.
तुम्हा हल्लीच्या मुलींना.. काय आयुष्यभर डाऊनलोडच करत बसणार का ?

अशी झापलीये त्या कोमल नाजुक मुलीला हो..
पोरगी रडतेयं अजुन…ते पण 4G स्पीड मधे. 

८) भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो …!

घरमालक:- अरे….१५०० रुपये भाड्याच्या खोलीत
मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का ?

९) एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !
पुणेरी अप्सरा:” कोण आहे तु ??

माणुस: मी HERO आहे TITANIC चा..
पुणेरी अप्सरा: “अरे काळ्या Titanic बुडली होती जळाली न्हवती

१०) नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे. 

११) पुणेकर: काका ८ समोसे द्या

दुकानदार- पार्सल देऊ ?

पुणेकर- नाही आ करतो कोंबा तोंडात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here