चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका पुन्हा गरम करून; भोगावे लागतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

सर्वसामान्य घरात रात्रीचे काही शिळे राहिले तर ते फ्रीजमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खाल्ले जाते. अन्नाच्या कणाचे महत्व असल्याने आपल्याला शिळे अन्न टाकून द्यावेसे वाटत नाही. मात्र काही शिळे पदार्थ आपण गरम करून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे तर नाहीशी होतात एवढेच नाही तर  आपल्या शरीरावर गंभीर गंभीर परिणाम होतात. काही पदार्थ असेही आहेत जे पुन्हा गरम केल्यास, विषारी पदार्थ होतात. अगदी कर्करोगासारख्या आजारालाही आपल्याला सामोरे जावे लागू शकते. हे 6 पदार्थ जे कधीही पुन्हा गरम करून खाऊ नयेत.

– अंड्यापासून तयार करण्यात आलेला कोणताही पदार्थ तुम्ही पुन्हा गरम करून खाऊ नये. पुन्हा गरम केल्यास, अंड्यातून टॉक्झिक रिलीज होतात आणि त्यामुळे अंडं पचण्यास त्रास होतो. 

– बटाटा पुन्हा गरम करून खाऊ नये. अन्यथा पोट जड होऊन पोट दुखण्याचीही शक्यता असते.

– चिकन पुन्हा गरम करून खाऊ नये कारण त्यामुळे पचनक्रिया बिघडते.

– कुठल्याही प्रकारचा भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला उल्टी अथवा जंतासारखे आजार होतात. 

– पालक गरम करून खाल्ल्यास त्यात असणारे नायट्रेट हानिकारक तत्वात बदलतात. जे पुढे कॅन्सरसारखा आजार होण्यासाठी कारणीभूत ठरतात.     

– मशरूम कधीही पुन्हा गरम करून खाऊ नये. तसं केल्यास, तुम्हाला पोटदुखीचा त्रास सुरु होऊन तुम्ही आजारी पडू शकता.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here