‘या’ ई-कॉमर्स वेबसाईटवर मिळताहेत जबरदस्त ऑफर्स; ‘त्या’ 5 प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर बंपर सूट

मुंबई :

सध्या भारतात उत्सवाचा हंगाम चालू झालेला आहे. त्यामुळे सर्वच ई-कॉमर्स कंपन्या विविध उत्पादनांवर भरघोस सूट देत आहेत. त्यातही मोबाईल्स, इलेक्ट्रोनिक वस्तूंला मोठी मागणी आहे. म्हणून त्यावरही मोठी सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टवर सध्या बिग दिवाळी सेल सुरू आहे. या सेलमध्ये प्रसिद्ध आणि बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर केला जात आहे.  १३ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये मिळणाऱ्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सविषयी जाणून घ्या.

  • – रियलमी नार्जो २०  ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत फ्लिपकार्टवर १६ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.
  • – पोको एम२ ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनला फ्लिपकार्ट सेलमध्ये १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.
  • – इन्फिनिक्स स्मार्ट ४ प्लस हा फोन ९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीऐवजी ७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. 
  • – रेडमी 9i ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनवर सूट मिळाल्यानंतर ८ हजार २९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो.
  • – iQOO 3  हा प्रीमियम स्मार्टफोन या सेलमध्ये ९ हजार ५०० रुपयाच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकतो.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here