.. तर तेजस्वी यादव मोडू शकतात शरद पवारांसह अनेकांचा विक्रम; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

बिहार निवडणूकीत राजद नेते तेजस्वी यादव यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. एकूणच वातावरणाचा अंदाज बघता तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, अशी शक्यता एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषक सांगत आहेत. तेजस्वी यांनी केलेल्या झंजावती दौऱ्यामुळे भाजप पूर्णपणे हादरून गेले असल्याचे समजत आहे. रोहित पवारांनी सुद्धा भावी मुख्यमंत्री असे विशेषण देत तेजस्वी यादव यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर ते शरद पवारांचा कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा विक्रम मोडू शकतात.

महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. तेजस्वी यादव यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. बिहारचे सर्वात तरुण मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा सतिश प्रसाद सिंह यांच्या नावावर आहे. सतिश प्रसाद सिंह जानेवारी 1968 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते.

झंझावती प्रचार दौरा करत 243 जागांसाठी 247 प्रचारसभा घेत प्रचारसभेचे सर्व विक्र्म्क मोडणारे तेजस्वी यादव पहिले आहेत. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांसाठी निवडणूक झाली आहे. तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीत विक्रमी 247 प्रचारसभा घेतल्या आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here