म्हणून रिलायन्समध्ये पुन्हा होणार विभागणी; मुकेश अंबानी ‘अशी’ करत आहेत तयारी

मुंबई :

यापूर्वी अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी या दोघांनी रिलायन्समध्ये वाटणी करून आपापल्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. आता रिलायन्समध्ये पुन्हा वाटणी होणार असल्याचे वृत्त दै.नवभारत टाईम्सने दिले आहे. कोविड 19च्या साथीच्या काळात रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या तंत्रज्ञान व रिटेल व्यवसायांसाठी 6.5 अब्ज डॉलर्स जमा केले. आता अंबानी कुटुंबाच्या म्हणण्यानुसार त्यांना तेलाच्या व्यवसायावरील अवलंबित्व कमी करून ईतरही व्यवसाय करून विविध क्षेत्रात उडी घ्यायची आहे.

विशेष म्हणजे आता अंबानींना आपली मुले आकाश, ईशा आणि अनंत यांच्यात व्यवसायाची वाटणी करायची आहे. आजवर मुकेश अंबानी यांनी आपला उत्तराधिकारी कोण असेल याबबतची घोषणा केली नसली तरीही ज्या पद्धतीने मुकेश अंबानींनी तंत्रज्ञान व रिटेल क्षेत्रातील आपला व्यवसाय वाढवला आहे. त्यावरून असे दिसते की, अंबानी आता पुढील पिढीच्या हातात व्यवसायाची धुरा सोपवू शकतात.

आजही रिलायन्सच्या कमाईतील मोठा वाट क्रूड ऑयल रिफाइनिंग और पेट्रोकेमिकल्स या व्यवसायातून येतो. मात्र सध्या रिलायंस रीटेल ही कमाईच्या बाबत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. जर फ्युचर ग्रुपसोबत रिलायन्सची डील झाली तर या क्षेत्रात रिलायन्सचा मोठा दबदबा असेल.

फेसबुक आणि गुगल सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी रिलायन्सची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्सच्या व्यवसायात आपल्या आवडीनुसार अंबानीची मुले महत्वाची भूमिका बजावत आहेत. अंबानींची जुळी मुले ईशा आणि आकाश यांनी कंपनीला डिजिटल व्यवसायात येण्याचा आग्रह धरला.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here