घरबसल्या खोला बचत खाते, काही सेकंदात मिळवा २५ लाखांपर्यंत पर्सनल लोन; वाचा, या बँकेच्या जबरदस्त स्कीम्स

मुंबई :

आयसीआयसीआय बँकेने गुरुवारी मिलेनियल्ससाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅंकिंग प्रोग्राम सुरू केला असून त्या अंतर्गत लोक घरातून इन्स्टंट सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतात. एवढेच नाही तर अवघ्या काही सेकंदात वैयक्तिक कर्जासह अनेक सुविधा ऑनलाईन घेऊ शकतात. बँकेने या योजनेचे नाव आयसीआयसीआय बँक माईन ठेवले आहे. iMobile या ऍपद्वारे तुम्हाला या बँकेच्या सर्व सुविधा मिळणार आहेत.

बचत खात्याव्यतिरिक्त मिलेनियल्ससाठी गुंतवणूकीचे मार्गदर्शन, विशेष क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील देण्यात येणार आहे. 18 ते 35 वर्षे वयोगटातील व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. त्या व्यक्तीस बँकेच्या वेबसाइटवरून किंवा गुगल प्ले स्टोअर वरून iMobile डाऊनलोड करावे लागेल.

आयसीआयसीआय बँक देशातील पहिले फ्लेक्सी प्लॅन क्रेडिट कार्ड ऑफर करीत आहे. या मदतीने ग्राहक त्यांच्या जीवनशैली आणि मासिक गरजा त्यानुसार योजना निवडू शकतात. ते iMobileवर तीन योजनांपैकी एक निवडू शकतात. कार्डने अ‍ॅमेझॉन, स्विगी, झोमाटो, मायन्ट्रा इत्यादींसह आणि मोठ्या डिजिटल ब्रँडवर 5 टक्के पर्यंत कॅशबॅक देखील जोडला आहे.

iMobileद्वारे दोन इन्स्टंट क्रेडिट सुविधाही मिळू शकतात. यात ते फक्त तीन सेकंदात 25 लाखांपर्यंतचे इंस्टा वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. दुसरे म्हणजे ते त्यांच्या खर्चासाठी इंस्टा फ्लेक्सीकॅश लिंक्ड ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here