म्हणून सरकारने रद्द केली तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशनकार्ड; वाचा काय आहे प्रकरण

दिल्ली :

आपल्याकडे एखादी योजना किंवा एखाद्या गोष्टीचा आर्थिक किंवा तत्सम स्वरुपात लाभ घ्यायचा असेल तर सर्रास खोटी कागदपत्रे समोर आणून लाभ घेतला जातो. असे अनेक प्रकरणे अगदी छोटमोठ्या गोष्टीतही घडत असतात. अशातच बोगसगिरीचे आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. देशभरातील तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहे.   

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत हा सगळं बोगस प्रकार समोर आणला आहे. एनएफएसएच्या अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी २०१३ पासून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केली आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्याच्या परिचालनामध्ये पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. 

रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डाटाबेसचे डिजिटायझेशन केल्यानंतर तसेच त्याला आधारकार्डशी जोडण्यात आल्यानंतर अपात्र किंवा बोगस रेशनकार्डची ओळख पटवल्यानंतर डिजिटाइज केलेल्या डेटामधील पुनरावृत्ती टाळून तसेच लाभार्थ्यांचे स्थलांतर किंवा मृत्यूच्या प्रकरणांची खातरजमा करून राज्य आमि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी २०१३ ते २०२० पर्यंत देशभरातील ४ लाख ३९ हजार रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here