‘या’ भाजप नेत्याचे मुंबई पोलीस आणि सरकारला आव्हान; गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच हिंमत असेल तर…

मुंबई :

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात स्वतःचा न्यायाधीश असल्यासारखी वक्तव्ये करत थेट स्टुडीओत बसून न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली गेली. त्यानंतर भाजपच्या राज्यातील आणि देशातील मंत्र्यांनी मविआ सरकारवर टीका केली. भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. एकूणच काय तर अर्णब प्रकरणात अर्णबपेक्षा भाजपच जास्त आक्रमक झालेली दिसत आहे. अर्णब प्रकरणी भाजप आमदार राम कदम हेही मोठमोठी पाऊले उचलताना दिसत आहेत. राम कदम हे अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते. तसेच या दरम्यान कदम यांनी अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचेही म्हटले होते. 

आता भाजप आमदार राम कदम हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे. 

राम कदम यांनी केलेलं ट्वीट :-

आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घेणार. देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार आहे. कुणाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here