म्हणून पेरूला लागली गळती; लाखो रुपयांचा बसला फटका

जालना :

पेरूच्या बागांवर एवढा खर्च करूनही आता पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या पेरूवर चुरडामुरडा रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे तसेच ढगाळ वातावरणाच्या बदलामुळे आता पेरूच्या फळाला गळती लागली आहे. फळे झाडांवरून खाली जमिनीवर पडत आहे. परिणामी लॉकडाऊन मध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अजूनच खोलात रुतला आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरात शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. वालसावंगी येथील पेरु उत्पादक शेतकरी प्रविण कोथलकर यांनी सांगितले की, ढगाळ वातावरणाचा फटका ढगाळ वातावरणाच्या बदलामुळे पेरू झाडांवरील फळे जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच दोन एकरावरील पिकांवर केलेला 1 लाख खर्च ही निघणे अवघड झाले. प्रशासनाने पंचनामे करावी व पिकविमा मंजूर करावा.

सध्या बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्याला गावोगावी फिरून मालाची विक्री करावी लागत आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन व कोरोना संकटामुळे परजिल्ह्यात विक्रीसाठी गाड्या जात नसल्याने फळांना स्वस्त भावाने विक्री करावी लागत आहे. अशातच फळांवर रोग पडल्याने उत्पादन कमी झाले आहे. तसेच पिकांवर केलेली फवारणी खते, पेरू बागेवर केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here