कोरोना काळात नोकरी गेली; ‘असा’ भरा अर्ज आणि मिळवा बेरोजगार भत्ता

कोरोना काळात अनेकांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली. कोरोनाच्या दरम्यान कोट्यावधी लोक बेरोजगार झाले. आता सर्व क्षेत्रातील परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी आर्थिक क्षेत्र या संकटातून अजूनही सावरलेलं नाही. दरम्यान सरकारने आता कोरोना काळात बेरोजगार झालेल्या लोकांसाठी भत्ता उपलब्ध करून दिला आहे. विशेष बाब म्हणजे आपण नोकरीचा क्लेम केल्यावर अवघ्या १५ दिवसात आपल्याला भत्ता मिळणार आहे.

केंद्र सरकारने सदर योजना आणली आहे.  सरकारने कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC)च्या अटल विमा कल्याण योजनेची (ABVKY) घोषणा केली होती. 20 ऑगस्ट 2020 रोजी ही घोषणा करण्यात आली होती. नोकरी गमावलेला लोकांना तीन महिन्यांच्या सरासरी पगाराचा 50 टक्के लाभ देण्याची घोषणा केली गेली, जी आधी 25 टक्के होती. 

ही कागदपत्रे आहेत गरजेची :-

  • तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याची माहिती देणारी कागदपत्र स्कॅन करुन ऑनलाईन अपलोड करायची आहे.
  • ईएसआयसीशी संबंधित कर्मचारी त्यासाठी महामंडळाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करु शकतात.

यांना मिळणार लाभ :-

  • खासगी कंपन्या, कारखाने आणि कारखान्यात काम करणाऱ्या याचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे. अपंग कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची मर्यादा 25,000 रुपये आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here