म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर उतरणार; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

कोरोनामुळे जगभरात आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शेअर मार्केट, सोने, इंधनांचे दर कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. एकूणच काय तर आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. आता अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यात आणखी घसरण झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांकडून दरकपातीची शक्‍यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्या दरकपातीसाठी अनुकूल आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा आठवडाभरात आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर शक्‍य तेवढी दरकपात केली जाऊ शकते.

ऐन दिवाळी उत्सवाच्या मुहूर्तावर सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार, असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पडल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना देण्याची तयारी सार्वजनिक तेल वितरक कंपन्यांनी केली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सातत्याने पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ होत होती. पेट्रोल डिझेलच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ त्यातही  केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावलेली एक्साइज ड्यूटी त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले होते.

दरम्यान हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की, पेट्रोलच्या किमती 30 दिवसांपासून स्थिर आहेत. तर, डिझेलच्या किमतीमध्ये ऑक्‍टोबरपासून बदल झालेला नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here