व्यापाऱ्यांसाठी खुशखबर : आली टॅप टू फोन कार्ड सेवा; व्हिसाने दिली खास दिवाळी भेट

करोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील लाइफस्टाइल आणि बँकिंग सेक्टरमध्ये मोठे बदल होत आहेत. एकमेकांशी संपर्क न ठेवता सुरक्षित व्यवहार करण्याच्या उद्देशाने व्हिसा कंपनीने पीसीआय सर्टिफाइड टॅप टू फोन कार्ड सिस्टिम आणली आहे.

पेमेंट टेक्नोलॉजीमध्ये जागतिक लीडर म्हणजे व्हीजा कंपनी. याच व्हीजाने डिजिटसिक्योअर आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करत टॅप टू फोन कार्ड सिस्टिम आणली आहे. डिलिव्हरीप्लस अशी ही सिस्टिम सुरू करणारी ही पहिली कंपनी असून एचडीएफसी बँक यांची अधिग्रहणकर्ता आहे.

या सिस्टिमचा वापर करून कंपन्या आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही कार्ड किंवा डिव्हाइसविना आपल्या एनएफसी इनेबल्ड अँड्रॉइड स्मार्टफोनच्या मदतीने सुरक्षितरित्या तत्काळ काँटॅक्टलेस पेमेंट स्वीकरण्याची सोय झालेली आहे. डिजिटसिक्योअरचे सीईओ शेशाद्री कुलकर्णी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, काँटॅक्टलेस पेमेंट स्वीकार करणे अनिवार्य होत आहे. डिजिटसिक्योरचे पीसीआय सर्टिफाइड अॅप फर्स्ट सॉफ्टपीओएस प्लॅटफॉर्मसह वित्तीय संस्था, व्यापाऱ्यांना कार्ड पेमेंट स्वीकारण्याची सुविधा देऊ शकेल. यामुळे व्यवहाराचा खर्च आणि वेळही वाचेल.

एचडीएफसी बँक आणि डिजिटसिक्योरसोबत भागीदारी करत पीसीआय सर्टिफाइड टॅप टू फोन कार्ड सिस्टिम प्रथमच डिप्लॉय करताना खूप आनंद होत असल्याचे व्हीजा इंडिया व साउथ एशियातील मर्चंट सेल्स अँड अॅक्वायरिंग हेड शैलेश पॉल यांनी म्हटले आहे.

ही आहे टॅप टू फोन टेक्नोलॉजी

टॅप टू फोन टेक्नोलॉजी व्यापारी आणि कंपन्यांना अशा पीसीआय सर्टिफाइड क्लाउड आधारित पेमेंट सिस्टिममध्ये सहभागी करत वित्तीय संस्था संचालनाचा खर्च खूप कमी करेल. यामुळे बँक आणि फिनटेक कंपन्यांना अधिक व्यापा-यांना कार्ड पेमेंट स्वीकारण्यास मदत करता येईल. कार्डधारक कोणत्याही व्यापाऱ्याच्या स्मार्टफोनवर टॅप करून सहज आणि सुरक्षित काँटॅक्टलेस पेमेंट करू शकतील. ही सिस्टिम लागू झाली तर व्यापाऱ्यांना काँटॅक्टलेस कार्ड पेमेंट स्वीकार करण्यासाठी व्हीजा टॅप टू फोन टेक्नोलॉजी उपलब्ध करून देणारा भारत १५ वा देश ठरेल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here