एक प्लेट पोहे खाण्याचे एवढे आहेत फायदे; वाचून व्हाल आश्चर्यचकित

सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता पोटभर असावा. भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. जेव्हा आपल्याला भरपूर भूक लागते, तेव्हाही बऱ्याचदा कांदे पोहे तयार करण्याचाच विचार केला जातो. कारण ‘पोहे’ हा पदार्थ झटपट तयार  होणारा आणि आरोग्यास हितकारी पर्याय आहे. भारतात विविध भागांत पोहे बनवण्याची पदधत निरनिराळी आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने कांदे पोहे खातात. पोहे नाश्त्यात खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शरीराला एनर्जी मिळते. तसेच मधुमेहाचा त्रास कमी होण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्यास तुमचे आरोग्य चांगले राहते आणि पोटही भरलेले राहते.

जाणून घेऊया फायदे :-

  1. पोहे पचण्यास हलके असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या होत नाहीत आणि पौष्टिक नाश्ताही खाल्ला जातो.
  2. दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते.
  3. कांदे पोहे खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात केल्यास तुमचे वजन वाढत नाही. सोबत तुमच्या आरोग्याला आवश्यक असणाऱ्या पोषण तत्त्वांचा पुरवठा देखील होतो.    
  4. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होण्यासही मदत मिळते.
  5. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात लोहाचा पुरवठा होतो, तेव्हा रक्त प्रवाहाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. परिणामी शरीरात ऑक्सिजनची पातळी देखील वाढते
  6. जर तुम्ही नियमित पोहे नाश्त्यातून खात असाल तर तुम्हाला यातून पुरेसे लोह मिळू शकते. ज्यांना अशक्तपणा अथवा अॅनिमिया आहे अशा लोकांना पोहे खाणे फायद्याचे ठरेल. गरोदर
  7. पोह्यामध्ये फायबर्स  असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहींनी नाश्त्यातून पोहे खाण्यास काहीच हरकत नाही. 
  8. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. यासोबतच यात गरजेचे व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here