‘हे’ गुण तुमच्याकडे असतील तरच होऊ शकता राजकारणी; वाचा जीवन बदलणारी खास माहिती

सत्ता कोणतीही असो, मग ती गावकीची असो की राज्याची किंवा देशाची. तिच्या केंद्रस्थानी तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला राजकारणात स्वतःला सिद्ध करावं लागते. राजकारणात अनेकांचे मातेरं झालेलं तुम्ही ऐकले असेल. गावकीच्या गावगुंड्यात अडकून अनेकांनी आपली वावर विकल्याच्या घटनाही तुमच्या कानी पडल्या असतीलच. म्हणूनच की काय, अनेकजण राजकारणापासून दोन हात लांब राहण्याचा सल्ला ही मोठी मंडळी देत असतात. मात्र, जर तुमच्याकडे जर काही अंगभूत राजकीय कौशल्य असतील तर ‘या’ सगळ्या अडचणीवर मात करून तुम्ही राजकारणात ‘सत्ता’ गाजवू शकता. अगदी मुरब्बी राजकारणी बनू शकता. चला तर मग ‘या’ या आगळ्यावेगळ्या राजकीय गुणांविषयी जाणून घेऊयात.

 1. विरोधकांवर वार करू नका, त्यांना गार करायला शिका. वार केल्याने शत्रूंच्या संख्येत भर पडते. त्यांच्याशी लढत बसण्यात आपली वेळ, शक्ती, आणि पैसा खर्ची पडतो. परिणामी आपला प्रगतीचा वेग मंदावतो. शिवाय गार केला तर विरोधक गप्प राहतो, वेळप्रसंगी तुमची मदत करू शकतो.
 2. अडथळे स्वतःहून उभे करू नका. शक्यतो त्यांना वळसा घालून पुढे चालत रहा.
 3. एक लक्षात ठेवा, रुळलेल्या वाटेने चालत जातो, तो कार्यकर्ता. तर स्वतःची नवीन वाट तयार करतो तो नेता.
 4. राजकारणातील वाट कधीही सरधोपट नसते, त्यात जागोजागी गतिरोधक असतात.
 5. वाटेवरील काटे साफ करण्यात वेळ दवडू नका. तुमचं आयुष्य संपेल मात्र, काटे संपणार नाहीत. म्हणून पायात मजबूत चप्पल अथवा बूट घाला, आणि बिनधास्तपणे चालत रहा. पाय वाचवा, म्हणजे तुमची आपोआप इच्छित स्थळी पोहणार.
 6. स्वतःला आर्थिक, शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवा. म्हणजे बिकट काळातही तुमचं मार्गक्रमण सुरूच राहील.
 7. राजकारणात कमालीची गुप्तता बाळगा. तुमची चाल इतरांना समजू देऊ नका.
 8. विरोधकांच्या प्याद्या मारण्याच्या नादात स्वतःचा वजीर गमावून बसू नका. तर ते प्यादं पुढ करण्यामागची कारणे शोधून चोख प्रत्युत्तर द्या.
 9. आरोप करायला जास्त अभ्यास करावा लागत नाही. मात्र, खंडन करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. आरोप करून सत्तेत जाता येते. तर आरोपाला उत्तर देत बसाल तर सत्तेतून पायउतार व्हावं लागतं.
 10. विरोधकाला उत्तरे देत बसू नका. कामे करत रहा. तेच विरोधकांना चोख उत्तर असते. जनतेच्या न्यायालयात विरोधकांना उघडे पाडा. हलकी माणसं नेहमीच आरोप करण्यात धन्यता मानतात. तर वजनदार माणसे कामे करण्यात.
 11. जगात टीका करणार्यांचे नव्हे तर कामे करणार्यांचे पुतळे उभारले जातात. प्रतिक्रियावादी होऊ नका. स्वतःला कामात झोकून द्या.
 12. तुम्ही कोणत्याही पक्षात, कोणत्याही पदावर रहा. मात्र, आपल्या नेत्याचा विश्वास संपादन करा. नेत्याच्या मनात जागा केली की, राजकारण तुमच्याभोवती फिरत राहते. निष्टावंत माणसाला राजकारणात मोठी किंमत असते. अर्थात निष्टावंत होणे म्हणजे लाचारी पत्करणे असे नव्हे. इतिहास निष्ठावंतांची नेहमीच दखल घेतो.
 13. युज अँण्ड थ्रो प्रवृत्ती असणार्या नेत्यांचे चेले बनू नका. आपल्या नेत्याचा इतिहास, भूगोल जाणून घ्या. जीवाला जीव देणारा नेता निवडा.
 14. कोणत्याही पदावर जाण्यासाठी पहिल्यांदा निवडणूक जिंकावी लागते. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पराभूत होणार नाहीत, याची दक्षता घ्या. मतदारसंघाची पक्की बांधणी करा.
 15. चांगल्या कामासाठी, वाढदिवसाच्यानिमित्ताने शुभेच्छा द्या. दु:खदप्रसंगी शोकसंदेश द्या. यामुळे बिनपैशात जिव्हाळा निर्माण होण्यास मदत होते.

अशा पद्धतीने साखरपेरणी करून आपला प्लॅटफॉर्म उभा करा. अशा पद्धतीने केलेले काम लोकांच्या नजरेत अपोआप भरते. मग त्यांना जास्त सांगण्याची गरज पडत नाही. लोकांना आश्वासक वाटणारा माणूस निवडून द्यायचा असतो. त्यामुळे शक्यतो नकारात्मक सूर अजिबात आळवू नका.

अनेकदा खरे बोलणाऱ्यांना राजकारणात अपयश येते. कारण, ते खरे बोलण्याच्या आणि वास्तवास भिडण्याच्या नादात मतदारांना आश्वासक वाटत नाहीत. तसेच मानसं जोडण्याच्या ऐवजी थेट तोडतात. त्यामुळे अशी मंडळी कितीही चांगली असोत मतदारांना नकोश्या वाटतात. अनेकदा त्यातही अपवाद म्हणून मातदार स्वीकारतात. मात्र, नंतर बदल न झाल्यास किंवा निराशा पदरी पडल्यास मतदार अपोआप बाजूला जातात.

संपादन : महादेव पांडुरंग गवळी

संचालक, स्टार प्रो आणि संपादक, साप्ताहिक राज्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here