धक्कादायक : पेपरकपमधून चहा पिणाऱ्यांनो सावधान; त्याचे आहेत हे भयंकर दुष्परिणाम

सध्या करोना काळामुळे तर पेपर कपमध्ये चहा पिणे हेच आपल्याला सर्वांना योग्य वाटायला लागले आहे. अगोदरही कप योग्य पद्धतीने धुतले जात नसल्याने पेपरचे कप चहा व कॉफी पिण्यासाठी वापरले जात होते. मात्र, आता त्याचे भयंकर दुष्परिणाम समोर आलेले आहेत.

भारतातील आयआयटी खरगपूर ही संस्था आपणास माहिती आहे ना? होय, ही एक जगप्रसिद्ध अशी शिक्षणसंस्था आहे. जिथे शिक्षण आणि संशोधन होते. येथील संशोधनातून ही धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे. नव्या वस्तूंचा वापर करताना आपण सगळेजण खूप वेगळ्या विचारांनी याच्या प्रेमात असतो. मात्र, त्याचे भयंकर दुष्परिणाम हे शरीरावर होत असतात.

असाच प्रकार कागदी कपाच्या बाबतीत घडत आहे. प्लास्टिकच्या कपमधून चहा किंवा कॉफी पिणे शरीरासाठी हितकारक नसल्याच्या बातम्या वाचून आपण सगळेजण कागदी कपाला महत्व द्यायला लागलो. मात्र, हे कपही हितकारक नाहीत. या कपमध्ये बनवताना एक प्लास्टिक वापरले जाते. ते गरम पदार्थांमुळे हळूहळू विरघळते आणि चहा/कॉफी यांच्यासह आपल्या पोटातही जाते.

हाइड्रोफोबिक फिल्म नावाचे हे प्लास्टिक असते. ते विरघळून पोटात जात असल्याने त्याचेही दुष्परिणाम आहेत. दिवसभरात ३ कप चहा पिणाऱ्यांच्या पोटात कागदी कपद्वारे 75,000 सूक्ष्म कण प्लास्टिक पोटात जातात. खरगपूर येथील एसोसिएट प्रोफेसर सुधा गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली एनवायरमेंटल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट विषयाचे संशोधक अनुजा जोसेफ आणि वेद प्रकाश रंजन यांनी यावर संशोधन केले आहे. त्याद्वारे ही आरोग्यासाठी अपायकारक असलेली गोष्ट लक्षात आलेली आहे. एकूणच यापुढे कागदी कप म्हणजे आपल्याच आरोग्याशी केलेला खेळ आहे हेही आपल्याला सर्वांना लक्षात घ्यावे लागणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here