आपल्याला नेहमीच वाटत असते की दिवसाची सुरुवात परफेक्ट व्हावी, चांगली व्हावी, मात्र काहीतरी बिनसत आणि मग सुरुवातच अशी झाल्यावर दिवस कसा जाणार, याचाही विचार आपण करू लागतो. उठल्यावर काय करायचं हे सगळ्यांना माहिती असत मात्र काय करू नये याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. दिवसाची सुरुवात परफेक्ट आणि चांगली हवी असेल तर या गोष्टी नक्कीच टाळा.
- सकाळी अर्लाम वाजल्यावर काही लोक तो अर्लाम बंद करून पुन्हा झोपी जातात. हे टाळा कारण तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटावं असं वाटत असेल तर अर्लामप्रमाणे उठा आणि कामाला लागा.
- सोशल मिडीयावर विविध प्रकारचे चांगले- वाईट मेसेज असतात. त्यातील क्राईम, दुःखद घटना आपल्यावर परिणाम करणाऱ्या असतात. सकाळी उठल्या उठल्या या गोष्टी पाहण्यामुळे तुम्ही त्याच विचारांमध्ये गुंतून राहता. ज्यामुळे तुमचं दिवसभराचं प्लॅनिंग बारगळू शकतं. म्हणून उठल्या उठल्या सोशल मिडीयावर जाऊ नका.
- बेडमध्येच कॉफी अथवा बेड-टी घेऊ नका. रिकाम्यापोटी तुम्ही कॉफी अथवा चहा घेतला तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. म्हणून उपाशीपोटी उत्तेजक पेय टाळा.
- सकाळी उठल्यावर मसालेदार अथवा चमचमीत पदार्थ खाल्ले तर तुम्हाला दिवसभर कंटाळवाणं आणि जड वाटू शकतं. यासाठी उठल्या उठल्या नाश्ता करण टाळा.
- सकाळी उठल्याबरोबर धुम्रपान अथवा मद्यपान करू नका. कारण त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस कंटाळवाणा होऊ शकतो.
संपादन : संचिता कदम
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव