अबबब… ‘या’ चारचाकी कंपनीच्या विक्रीत यावर्षी होऊ शकते 20 टक्क्यांची घट

मुंबई :

सुझुकी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षात देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकीची विक्री 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. सुझुकीने दिलेल्या या अंदाजामुळे बाजार आणि अर्थ तज्ञ हैराण झाले आहेत. कारण सध्या मारुती सुझुकीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच साथीच्या रोगाचा कंपनीवर कमी परिणाम होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

सुझुकीने प्रथमच या आर्थिक वर्षाच्या विक्रीचा अंदाज वर्तविला आहे. कंपनीचे प्रमुख तोशिहिरो सुझुकी यांनी गेल्या आठवड्यात जपानी विश्लेषकांना सांगितले की, कोविडची परिस्थिती पाहता कंपनीच्या विक्रीबद्दल काहीच निश्चित सांगू शकत नाही.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतात अजूनही कोरोनाचे काय होईल, तेथील सरकार यावर काय कार्यवाही करेल याबाबतही सांगता येणार नाही म्हणूनच भारताबद्दल कोणताही अंदाज लावणे कठीण झाले आहे.

गेल्या महिन्याच्या तिमाही निकालानंतर मारुती सुझुकीच्या उच्च व्यवस्थापनाने सांगितले होते की डिसेंबरपर्यंतच मागणी वाढत आहे. मात्र असे असले तरी पुढील परिस्थितीबद्दल आम्ही जास्त काही सांगू शकत नाही. दरम्यान मारुती सुझुकीने मात्र याबाबत कुठलेही भाष्य केलेले नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here