दिवाळीचा मोठा धमाका : गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत केली 2 लाख कोटींची कमाई; ‘हे’ शेअर्स आहेत तेजीत

मुंबई :

मजबूत जागतिक निर्देशांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेअर बाजारात दिवाळीपूर्वी तेजी दिसून येत आहे. आजच्या बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवसायात सेन्सेक्स 600 अंकांची वाढ नोंदविली आहे. त्याचबरोबर निफ्टीही 170 अंकांनी वाढून तो 12450 च्या जवळपास ट्रेड करीत आहे.

बँक आणि वित्तीय शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. आयटी निर्देशांकातही बळकटी आहे. ब्रॉड मार्केटमध्येही तेजी आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स वाढले आहेत. जागतिक सिग्नलविषयी पाहता डाऊ फ्यूचर्स 300 अंकांनी वाढले आहेत. आशियाई बाजारपेठ देखील मजबूत झाली आहे.

सेन्सेक्समधील सर्व 30 ही शेअर्स मध्ये तेजी दिसून आली आहे. आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचयूएल, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, भारती एअरटेल आणि एशियन पेंट्स आज अव्वल स्थानी आहेत.

आज सकाळी सकाळीच गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. शुक्रवारी बाजार 1,63,60,699.17 कोटी रुपयांवर बंद झाला होता. आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांची बाजारपेठ 1,65,45,013.79 कोटी रुपयांवर पोहोचली. म्हणजेच काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here