Windows यूजर्ससाठी मोठा धोका; दिला ‘हा’ गंभीर इशारा

दिल्ली :

सध्या इंटरनेटवर असलेल्या माहितीची चोरी आणि गोपनीय माहितीचे संकलन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या माहिती चोरी प्रकरणांमध्ये आजवर प्रामुख्याने मोबाईलचा वापर केला जायचा. मात्र आता हॅकर्सने थेट विंडोज ऑपरेटिंग सिस्टमला टार्गेट केले आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे लॅपटॉप आणि कंम्प्यूटरला आता धोक्याची सूचना देण्यात आली आहे.     

सदर माहिती चोरी प्रकरणाचा खुलासा गुगल प्रोजेक्ट झिरोची सिक्योरिटीजने केला आहे. त्यांनी एक सिक्योरिटी बगची माहिती समोर आणली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे जी विंडोज ७ पासून १० या दरम्यान सर्व व्हर्जनसाठी धोका बनला आहे. या बगला फिक्स करण्यासाठी ७ दिवसांचा वेळ लागणार असल्याचे समजत आहे. गुगल या बग संबंधी आणि डिटेल्स लवकरच शेयर करणार आहे. हॅकर्स या द्वारे विंडोज कर्नल क्रिप्टोग्राफी ड्रायव्हरला अटॅक करण्यासाठी युजरच्या कंम्प्यूटरला अॅडमिनप्रमाणे कंट्रोल करू शकतो.

महाराष्ट्र टाईम्सने काही रिपोर्टच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मंगळवारी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी बग फिक्स रिलिज करू शकते. युजर्सच्या डेटाला धोका पोहोचू नये यासाठी ब्राउजर अपडेट करण्यासाठी चांगला पर्याय आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here