CID चे हे अशक्य पांचट जोक वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

1.  दया –  सर हा आलोकनाथ चप्पल काढत आहे

एसीपी – याचा अर्थ कळतोय का दया?

दया – नाही सर

एसीपी – याचा अर्थ आता तो टेंपल रन खेळणार आहे….

==========================

2. सनी, मला काहीतरी आंबट खावंसं वाटत आहे

एसीपी – याचा अर्थ कळतोय का दया?

दया – हो सर, मला कळलं. याचा अर्थ ही आई होणार आहे

एसीपी – नाही दया याचा अर्थ सनी बाप होणार आहे

===========================

3. अभिजीत – दया टाकीमध्ये पाणी नाहीये

दया – काय टाकीमध्ये पाणी नाहीये?

अभिजीत – हो दया टाकीमध्ये पाणी नाहीये

एसीपी – याचा अर्थ टाकी रिकामी आहे

========================

4. दया – अरे देवा याचा मृत्यू झालाय

एसीपी – याचा अर्थ याचा मृत्यू झाल्याने हा मेलाय

साळुंखे – नाही बॉस याचा मृत्यू मरण्याने नाही तर जीव गेल्याने झालाय 

===========================

5. दया – सर बॉडीजवळ हे पेन मिळालं

एसीपी – दया बस झालं आपलं काम, आता फक्त या गोष्टीचा शोध लावायचा आहे की,  

मुंबईमध्ये कोण कोण पेन वापरतं

==========================

6. राहुल माझा भाऊ होता 

अभिजित – काय राहुल तुझा भाऊ होता?

हो माझा भाऊ होता 

दया – काय खरंच राहुल तुझा भाऊ होता ?

हा सर तो माझा भाऊ होता 

एसीपी – माय गॉड! याचा अर्थ तू राहुलची बहीण आहेस

=============================

7. एसीपी – दया शोध लाव हा खून कोणी केलाय?

दया – हा खून खुन्याने केला आहे 

एसीपी – मला पहिल्यांपासूनच संशय होता की, खून खुन्याने केलाय

===========================

8. एसीपी – ललित, माल्या, निरव कुछ समझा दया?

दया – येस सर, एल, एम आणि एन नंतर आता नव्या स्कॅमस्टरचं नाव ओ पासून सुरू होणार आहे.

==========================

10. अभिजीत – उद्या गुरूवार आहे

एसीपी – याचा अर्थ कळला का दया?

दया – नाही सर

एसीपी – याचा अर्थ उद्या शुक्रवार नाहीये

=======================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here