उठा उठा दिवाळी आली, घरच्या घरी उटणे तयार करण्याची वेळ झाली; असे बनवा नैसर्गिक ‘उटणे’

आता दिवाळी आलेली आहे. सगळीकडे चैतन्य पसरलेले आहे. पहाटेच्या अभ्यंग स्नानापासून तर संध्याकाळी दिवे लावण्यापर्यंत अशा अनेक गोष्टींची तयारी सुरु झालेली आहे. आपल्या बांधवांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या मित्रांची आणि गावकऱ्यांची काळजी घ्यायची म्हणून यावर्षी आपण फटाकेबाजी करणार नाहीत. मात्र बाकी सगळी धम्माल, मज्जा करणारच आहोत. आता सुरुवात होते पहाटेच्या अभ्यंग स्नानापासून. सध्या आपल्याकडे केमिकल मिश्रित उटणे मिळते. मात्र यावर्षीपासून आपण या केमिकलवाल्या उटण्याला सुट्टी देणार असून नैसर्गिक ‘उटणे’ लावणार आहोत. आज आम्ही घरीच उटणे कसे बनवावे याबाबत माहिती सांगणार आहोत.

उटणे बनवण्यासाठी हे साहित्य घ्या मंडळीहो…

–    1 चमचा चंदन पावडर

–    2 चमचे बेसन पावडर

–    अर्धा चमचा हळद पावडर

–    2 चमचे कच्चं दूध

–    मिश्रणाकरिता बाऊल

–    अॅप्लिकेटर

उटणे कसे बनवायचे तेही जाणून घ्या :-

–    बाऊल घ्या, त्यात सर्व पावडर घ्या आणि मिक्स करा.

–    त्यानंतर त्या दूध घाला. अॅप्लिकेटरच्या साहाय्याने सर्व घटकांची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या.

–    ही पेस्ट जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावी. तसंच त्यात गुठळ्या होऊ नयेत. हे मिश्रण चेहऱ्यावर नीट पसरून लावता आले पाहिजे. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर 15-20 मिनिटं ठेवा किंवा ते सुकेपर्यंत ठेवा. एकदा हा मास्क सुकल्यावर कोमट पाण्याने धुवून टाका.

संपादन : संचिता कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here