‘हात, पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात’; भाजप नेत्याची ‘त्या’ पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी

कोलकता :

दिवसेदिंवस निवडणूक जवळ आल्यावर राजकारण सगळं विसरायला भाग पडते. संघर्ष इतका टोकाला जातो की तिथे जिवाचीही पर्वा केली जात नाही. सध्या चालू असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी रक्तरंजित संघर्ष झाल्याच्या घटना समोर आल्या. आता जीवावर उठण्याचं हे वारं पश्चिम बंगलाकडे वळताना दिसत आहे. कारण आता पश्चिम बंगलामध्ये विधानसभा निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूलमधील संघर्ष अधिकच गडद होताना दिसत आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी. घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना ‘या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी नाहीतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन. सुधारणा झाली नाही तर अशा गुंड कार्यकर्त्यांचे हात, पाय, डोकं फोडल्याशीवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी जाण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये पाठवू. यानंतरही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर थेट त्यांना स्मशानातच पाठवू’ अशी धमकी दिली आहे.

या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप बिहारपेक्षा जास्त ताकद पश्चिम बंगालमध्ये लावणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

संपादन : स्वप्नील पवार         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here